Breaking


भाजप आमदाराने माझ्या थोबाडीत मारली, ते बॉम्ब घेऊन आले होते, पोलीस अधिकाऱ्यांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरललखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशातच उत्तर प्रदेशमधील हिंसाचारा बद्दल एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


या व्हिडीओ मध्ये पोलीस अधिक्षक प्रशांत कुमार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत, त्यामध्ये ते वरिष्ठांना घटनेची माहिती दित आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "मुझे भी थप्पड़ मारा" "ये बम भी ले कर आए हैं, बीजेपी वाले, विधायक और ज़िलाध्यक्ष" हा संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ईटवाह जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे योगी सरकार या घटनेतील आरोपींवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा