Breaking


भाजप नेत्याला शेतकऱ्यांनी धुssधुss..!धुतले; कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले!


नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या माथी मारलेल्या "कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असतांनाच राज्यस्थानमध्ये शेतकऱ्यांनी रौद्ररूप धारण केले. त्यांच्या सहनशीलतेचा बांध अखेर फुटला! शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. राज्यस्थान मध्ये शेतकऱ्यांचे रौद्ररूप पहायला मिळाले. श्रीगंगानगर येथे "कृषी कायदे, महागाईविरोधात" शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत चालू होते.


या आंदोलकांना रोखण्यासाठी स्थानिक भाजप नेते कैलास मेघवाल तेथे आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने केलेले कायदे कसे फायदेशीर आहेत हे समजावत होते. त्यानंतर मेघवाल यांचे काहीही एकूण घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. तरीही मेघवाल तेथून जात नव्हते, अखेर शेतकऱ्यांचे संतुलन बिघडले त्यांनी मेघवाल यांना धुssधुss...!धुतले, त्यांचे कपडे फाडले,लाथा-बुक्क्यांनी तुडवले. "एएनआय"या वृत्तसंस्थेने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रसारित केले.

याबाबत अधिक माहिती अशी की,भाजप नेते कैलाश मेघवाल हे आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी पोहचले. केंद्र सरकारने केलेले कायदे शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे समजावत असतांनाच शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. शेतकऱ्यांनी रौद्ररूप धारण केले आणि अचानक या भाजप नेत्यावर हल्ला करण्यात आला. आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी कैलास मेघवाल यांना धुssधु...!धुतले. त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यांचे कपडे फाडले. त्यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण काही काळ होते. 

अखेर पोलिसांनी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या तावडीतून मेघवाल यांना सोडविले. शेतकरी इतके आक्रमक झाले होते की, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अखेर बळाचा वापर करावा लागला. दरम्यान या पूर्वी रविवार (दि. २५ जुलै) रोजीही असाच प्रकार घडला होता. भाजपचे जेष्ठ नेते सैनिक कल्याण समितीचे माजी अध्यक्ष निमकाथाना येथील माजी आमदार प्रेमसिंह बाजोर यांच्या सोबतही आंदोलन कर्त्यांचे बिनसले होते. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रेमसिंह यांना मारहाण केली होती. त्यांची गाडीही फोडली होती.

संपादन - रवींद्र कोल्हे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा