Breaking

सुरगाणा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासाठी भाजपा कार्यकर्त्यांची दिल्ली दरबारी धाव


सुरगाणा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लावणार - खासदार डॉ.भारती पवार


कळवण सुरगाणा विधानसभेतील शिष्टमंडळाला मंडळाला डाॅ.पवार यांचे आश्वासन


सुरगाणा / दौलत चौधरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार तथा कुटूंब कल्याण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची निवड झाल्याने कळवण सुरगाणा  तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे जाऊन निर्माण भवनात भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत सुरगाणा तालुक्यातील आरोग्याच्या समस्यावर सविस्तर चर्चा केली.


यावेळी डॉ.पवार यांनी आदिवासी भागातील कोविड लसीकरण बाबतीत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी जनजागृतीकडे लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढविण्या करीता सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.



त्याचप्रमाणे तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पदाधिकारी यांनी केली असता लवकरच हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डाॅ.पवार यांनी दिले. 


यावेळी शिष्टमंडळा तर्फे निवेदन सादर करण्यात आले की, तालुका हा आदिवासी बहुल असून अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात मंजूर करण्यात यावे या बाबतीत पाठपुरावा करुन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच उबरठाण, बोरगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे. बा-हे, उंबरठाण, पांगारणे, खोकरविहीर, श्रीभुवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात भाजपा ग्रामीण उपजिल्हाध्याक्ष रमेश थोरात, संघटन सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, सरचिटणीस एस.के. पगार, जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य सचिन सोनवणे, कोषाध्यक्ष रामकृष्ण पगार, दीपक खोत, गोरखनाथ महाले, हिरामण चौधरी आदी शिष्टमंडळात समाविष्ट होते.


निवेदनावर दिनकर पिंगळे, सचिन महाले, बाळासाहेब सुर्यवंशी, प्रभाकर पवार, सुरेश देशमुख, हेमराज धुम, नारायण महाले, रामदास चौधरी, यमुना वार्डे, सलमान शेख, युवराज चौधरी, हिरामण चौधरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा