Breaking
चांदवड तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा - भाऊसाहेब चौधरीचांदवड (सुनिल सोनवणे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आज दि.१६ जुलै रोजी चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने नाशिक शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते काजीसांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिवसंपर्क अभियानास प्रारंभ करण्यात आला.


या प्रसंगी भाऊ चौधरी यांनी मरगळ झटकून कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागावे व कोरोना काळात ज्या लोकांनी मदत केली त्यांचा सत्कार करा, गाव पातळी संघटना मजबूत करा, यावेळी शिवसंपर्क अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, तसेच भविष्यातील निवडणुका लक्षात घेता संघटनेतील बदल, गावपातळीवरील नियुक्त्या, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविणे याबद्दल मार्गदर्शन  केले. 


या प्रसंगी जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलासभवर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन   सोमनाथ पगार यांनी केले. तालुका संघटक केशव ठाकरे यांनी आभार मानले व पुढे तळेगांव रोही, निमोण, दुगाव, चांदवड शहरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आला. 


या शिवसंपर्क अभियानात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, विधानसभा संपर्क प्रमुख ललित शाईवाले, युवासेना तालुका अधिकारी रोहित ठाकरे, उपतालुका प्रमुख रवींद्र काळे, घमाजी राजे सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसंपर्क कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा