Breaking


जिल्हाधिकारी बनली आणि 'ती' ने घातला अनेकांना 'गंडा'


पुणे / रवींद्र कोल्हे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मध्ये अनिता नामक महिलेने एजंटगिरी करीत असल्याचा फायदा उठवून आपण जिल्हाधिकारी व तहसीलदार असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घातला असल्याच्या तक्रारी येरवडा पोलिस ठाण्यात आल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरात पिंपरी-चिंचवड महानगर कार्यक्षेत्रात आणि येरवडा शिवारात अनिता भिसे या महिलेचा पिंपरी-चिंचवड वावर असल्याने तुला ठिकाणीही काहींना फसवल्याचा संशय आहे.या महिलेच्या विरोधात एकूण पाच जणांनी फसवणुक केली असल्याची फिर्याद येरवडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

अनिता भिसे या महिलेला अटक करण्यात आली असून,तिच्या विरोधात दुर्गेश्वरी चित्तर वय ४७ वर्षे,रा.उत्तम टाऊन स्केप सोसायटी, येरवडा, पुणे ) यांनी येरवडा पोलिस ठाणे फिर्याद दिली आहे. अनिता भिसे या महिलेने अपंगांसाठी शासकीय भूखंड मिळवून देण्याचे आमिष चित्तर दांपत्यांना दाखविले होते. संबंधितांकडून २७ लाख ५० हजार रुपये आरोपी अनिता भिसे हिने घेतले होते. मात्र भूखंड न मिळाल्याने चित्तर यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनिस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समीर कर्पे, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी परिश्रम घेतले आणि आरोपी अनिता व्हिसे रहिस ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता बनावट शिक्के, बनावट कागदपत्रे, तसेच इतर काही लोकांना नोकरीला लावण्यासाठी तयार केलेली बनावट कागदपत्रे पोलीसांना सापडली.

चित्तर दांपत्याप्रमाणे इतर ५-६ जणांनी अनिता भिसे हिच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. आजपावेतो या महिला आरोपीने एकूण ५०-६० लाख रुपयांचा गंडा घातला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे. अशा लोकांनी येरवडा पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन येरवडा पोलिस ठाणे पोलिसांनी यांनी केले. 

या कारवाईत पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक समीर कर्पे, उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलिस हवालदार दत्ता शिंदे, गणेश वाघ, वर्षा सावंत, राजेंद्र ढोणे, विठ्ठल भंडारी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा