Breaking


बीड : प्रेम प्रकरणातून ‘त्या’ नर्सची आत्महत्या


नेकनूर / अशोक शेरकर : मांजरसुंबा घाटात एका नर्सने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल उघडकीस आली होती. या प्रकरणी आज नेकनूर पोलीस ठाण्यात मयत नर्सच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेम प्रकरणातूनच तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


सोनाली अंकुश जाधव (वय २६, रा. शिवाजीनगर बीड) या नर्सने काल मांजरसुंबा घाटात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला होता. 

आज या प्रकरणी मयत सोनाली हिच्या भावाने नेकनूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्षय राजाभाऊ आव्हाड (रा. स्वराज्यनगर बीड) याचे आणि मयत सोनालीचे प्रेमप्रकरण होते. सोनाली अक्षय आव्हाडला माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणत होती. मात्र अक्षयचे यापुर्वीच लग्न झालेले असल्याने तो लग्न करण्यास तयार नव्हता. या नैराश्यातूनच सोनालीने आत्महत्या केली असून या आत्महत्येला आरोपी अक्षय राजाभाऊ आव्हाड हा जबाबदार आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार किशोर काळे हे करत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा