Breakingबीड : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड महेंद्र सिंह यांना आदरांजली !


बीड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे व महाराष्ट्र राज्य सचिवमंडळाचे सदस्य, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)च्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य कॉ. महेंद्र सिंह यांचे ४ जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षे वयाचे होते. 


कॉम्रेड महेंद्र सिंह यांना अभिवादन करण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्‍सवादीचे तालुका सचिव कॉम्रेड बाबा सर, डीवायएफआय चे तालुका सचिव कॉम्रेड सय्यद याकुब, बीड जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड सादेक पठाण, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना लाल बावटा चे अध्यक्ष शेख चून्नू, एडवोकेट अलीम पठाण, डॉक्टर मक्सूद, शेषराव आबुज, शेख मेहबूब, विठ्ठल सक्राते शेख समीर, शेख रहीम यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा