Breaking


पीक विमा संदर्भातील उद्या बीडला आंदोलन, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


परळी वै. : २०२० चा पिक विमा कोणत्याही अटी शर्ती न लावता मंजुर करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा बीडच्यावतीने आज दि 30 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन किसान सभेचे नेते कॉ. अँड. अजय बुरांडे यांनी केले आहे.


2020 च्या खरीप हंगामातील झालेल्या नुकसानीचे  महसुल विभागाने पंचनामे करूण नुकसान भरपाई दिलेली आहेत. शासनाचा नुकसानीचा आलेला अहवाल ग्राह्य धरूण अग्रीकल्चरल ईन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा २०२० चा पिक विमा कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्ती न लावता मंजूर करावा या मागणीला घेऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होणार आहे. करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ.मोहन लांब, कॉ. भगवान बडे, कॉ.बालाजी कडभाने व जिल्ह्या कमिटी सदस्य यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा