Breaking


नारायणगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न !


जुन्नर / रफिक शेख : महाविकास आघाडीने राज्याचे वाटोळे केले आहे. जनतेचा अपमान करून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडी सरकार तयार केले. दिशाहीन असलेली महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर करून पुढील काळात हे सरकार उलथून टाकू, असे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.


नारायणगाव येथील भारतीय जनता युवा मोर्चा जुन्नर तालुका जनसंपर्क कार्यालय व युवा वॉरियर योजनेचे उदघाटन माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

राज्यात क्रांती घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व युवा वॉरियर कार्यकर्त्यांनी सज्ज रहा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

पुढे बोलताना बानकुळे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटुळे केले, पुरग्रस्तासाठी एक रुपायाची मदत केलेली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातशे कोटीची मदत महाराष्ट्राला करतात पण हे सरकार लोकांसाठी काहीच मदत करत नाही."

यावेळी युवा वॉरियर महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनुप मोरे, भाजपा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सुशील मेंगडे, संतोष तांबे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा