Breaking
भरतसिंग पावरा यांची बिरसा फायटर्सच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवडनंदुरबार : भरतसिंग पावरा यांची बिरसा फायटर्सच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भरतसिंग पावरा  यांची नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्याची घोषणा सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी केली.


नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार आहोत. तसेच नंदुरबार जिल्हयात बिरसा फायटर्सच्या गाव शाखा आपण वाढवणार आहोत, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष भरतसिंग पावरा यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा