Breakingबोईसर : कॅम्लिन चौकाचे शहीद चंद्रशेखर आझाद चौक नामकरणपालघर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पालघर तालुका समितीच्या वतीने  आज दि.२३ जुलै रोजी शहीद चद्रशेखर आझाद जयंती निमित्त बोईसर MIDC मधिल कॅम्लिन चौक या चौकाच नाव बदलून शहीद काॅ. चंद्रशेखर आझाद चौक असे नामकरण करण्यात आले.या चौकाला काॅ.मधुकर डवला व काॅ.सुनिल सुर्वे याच्या हस्ते पुष्प अर्पण करुन उद्घघाटन करण्यात आले. काॅ.चंद्रशेखर आझाद अमर रहे - अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


यावेळी उद्गघाटन वेळी काॅ.सुनिल सुर्वे, काॅ.हर्षद लोखंडे, काॅ.जाॅन, काॅ.शिवा, काॅ.मधुकर डवला, काॅ.हरेश वावरे, काॅ.निलेश विचारे, काॅ.भगवान लहांगे, काॅ.अनंता सांबरे, काॅ.मोहन पिल्ले, काॅ.दिनेश चव्हाण, काॅ.संतोष कामडी, काॅ.गिता, काॅ.निशा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा