Breakingब्रेकिंग : अमिर खान आणि किरण राव यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय, वाचा काय म्हणाला अमीर !मुंबई : बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे अमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितले की ते त्यांचा मुलगा आझादसाठी ते सह-पालक म्हणून कायम राहतील.


अमीर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ ला लग्न केले होते. त्यानंतर आता तब्बल १५ वर्षे सोबत संसार केल्यानंतर या दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


या घटस्फोटाबाबत दोघांनीही अधिकृतरित्या एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

 


 काय म्हटलंय अमीर आणि किरणने ?


"आम्ही १५ वर्षे एकत्र राहिलो, प्रत्येक क्षण आनंदाने जगलो तसेच आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आपण आपल्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू, यापुढे आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाही. परंतु आम्ही मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून राहू. आम्ही चित्रपटांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू. आमच्या नातेसंबंधाबद्दल नेहमी समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार. हा घटस्फोट शेवट नसून एका नवीन प्रवासाच्या प्रारंभाच्या रुपात दिसेल. धन्यवाद आणि प्रेम, किरण आणि आमिर.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा