Breaking...पण सामनामध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल" मनसेची शिवसेनेवर टीकामुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे, संरक्षण भिंत, दरड कोसळून आता पर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.

 


 मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जसा बेस्ट "शी.एम" चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल. मुंबईकरांची एव्हढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामना मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल" असे ट्विट मध्ये म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा