Breaking


पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी माकपचे गटनेते कॉ. रामू पागी यांची बिनविरोध निवड


पालघर : जिल्हा परिषद पालघरच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २९/०७/२०२१ रोजी पार पडली. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे-पालघर जिल्हा कमिटी सदस्य, तलासरी झाई गटाचे जि. प. सदस्य आणि जिल्हा परिषदेतील पक्षाचे गटनेते कॉ. रामू पागी यांची बिनविरोध निवड झाली. पालघर जिल्हा वेगळा झाल्यापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा परिषदेतील पहिले सभापती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. यावेळी आमदार कॉ. विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा तसेच महाविकास आघाडीचे सर्व जि.प.सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा