Breakingशेवगाव येथील न्यू आर्टस् महाविद्यालयाचा ४४ वा वर्धापन दिन साजरा !


अहमदनगर / डॉ.कुडलिक पारधी : शेवगाव येथील न्यू आर्टस् महाविद्यालयाचा  ४४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दिनाक १७ जुलै २०२१ रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, वक्ते म्हणून  महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य,ज्येष्ठ प्राध्यापक  किसनराव माने यांनी "माझ्या नजरेतील महाविद्यालयाची गरुड झेप"  या विषयावर Google Meet च्या माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापने पासून महाविद्यालयातील विकास व येणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे सहकार्याच्या मदतीने आत्तापर्यंतच्या अनेक  प्राचार्यांन संस्थाचालकांच्या मार्गदर्शनातून मात केली व आज असा वटवृक्ष तयार झाला आहे असे प्रतिपादन किसनराव माने यांनी केले.

महाविद्यालयातील कामाची जबाबदारी घेऊन काम  करा यातूनच व्यक्तिमत्वाचा ही विकास होतो व  महाविद्यालयाचा ही विकास होतो. महाद्याविद्यालयाच्या विकासात प्रत्येकाने आपला वाटा दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी प्राध्यापकांकडून  व्यक्त केली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे हे होते. या कार्यक्रमात  डॉ. गोकुळ क्षीरसागर, राजेश वळवी, प्रा. मिनाक्षी चक्रे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. वसंत शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. किशोर कांबळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा