Breakingचंद्रपूर : आशा व गटप्रवर्तकांनी संघटना बळकट करणे गरजेचे - राजेंद्र साठे


चंद्रपूर : चंद्रपूर येथे आशा व गटप्रवर्तक यांची बैठक आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे राज्य पदाधिकारी राजेंद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच रमेशचंद्र दहिवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांची संघटना बांधून त्याला बळकट करणे ही ग्रामीण तसेच शहरी आशा व गटप्रवर्तक यांची जिम्मेदारी आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी केले. 

त्याच बरोबर आशा व गटप्रवर्तक यांना आपले अधिकार मिळवून द्यायचे असतील तर सीआयटीयू फक्त योग्य पर्याय आहे अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. बैठकीस मार्गदर्शन करताना नागपूरच्या महासचिव कॉम्रेड प्रीती मेश्राम यांनी आशा वर्कर च्या कामकाजाच्या पद्धती व त्यांना मिळणारा मोबदला त्याचप्रमाणे संघटना बांधणी करताना उचलण्यात येणारे पाऊल यावर मार्गदर्शन केले. 

कॉ. रमेशचंद्र दहिवडे यांनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांनी अंगणवाडी सेविका यांना उद्देशून आशा वर्कर युनियन अंगणवाडी युनियनच्या बरोबर येणे ही महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. बैठकीचे आभार प्रदर्शन कॉ. प्रमोद गोडघाटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा