Breaking


चांदवड : ''कृषी दिन'' वृक्षारोपण करून साजराचांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड नगरपरिषद व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता. १ जुलै) जागतिक कृषी दिन निमित्ताने खोकड तलाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया चांदवड यांच्यातर्फे ५० झाडे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती चांदवड नगरपरिषद अभियंता सत्यवान गायकवाड यांनी दिली.


नगरपरिषदेने वृक्ष संरक्षक जाळ्या उपलब्ध करून दिल्या. यानंतर नगरपरिषदेने जेसिबी व मनुष्यबळ वापरून खड्डे तयार करून वृक्षारोपण केले. यावेळी स्टेट बँक व्यवस्थापक निलेश पाटील इतर स्टेट बँक कर्मचारी, नगरपरिषद स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक हर्षदा राजपूत, ललित जाधव, संजय गुरव, यशवंत बनकर,  कैलास गांगुर्डे, अर्जुन गायकवाड व इतर नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा