Breaking
चांदवड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावरचांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड नगरपरिषद मधील स्वच्छता विभाग वारंवार सोशल मीडियात या ना त्या कारणाने चर्चेत असतो. मात्र आज चांदवड शहरातील फुलेनगर परिसरात असलेल्या एका फलकाची चर्चा चांगलीच रंगली आहे.


चांदवड गणुर रस्त्यावर टेलिफोन एक्सचेंज शेजारी फुलेनगर एन्ट्री पॉईंट आहे, सुरुवातीस मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. याबाबत नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांचेकडे तक्रार करूनही स्वच्छता न झाल्याने फलक लावण्याची अनोखी शक्कल लावण्यात आल्याची चर्चा होत आहे. येथील कचरा न उचलल्यास नगरपरिषदेच्या आवारात टाकण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याचे दिसून येते.सदरील परिसराच्या स्वच्छता बाबत आमचे प्रतिनिधी सुनील सोनवणे यांनी चांदवड नगरपरिषद स्वच्छता अभियंता यांचेशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. परिसरातील नागरिक नगरपरिषदेतून घंटागाडी वेळेवर येत नसल्याचे तक्रार करत होते. या परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याची वारंवार सांगूनही लाईट दुरुस्ती होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.


सदर कचरा नगरपरिषदेने त्वरित उचलला नाही तर तोच कचरा चांदवड नगर परिषदेमध्ये टाकण्यात येईल असा इशारा फुलेनगर स्थानिक रहिवासी यांनी दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा