Breaking


चांदवड नगरपरिषदेने अनभिज्ञ न राहता शहरात सर्वेक्षण व फवारण्या करणे गरजेचे


चांदवड (सुनील सोनवणे) : चांदवड शहरा नजीकच्या काही भागांमध्ये डेंग्यू व चिकणगुनियाची साथ सुरू आहे. उमराणे परिसरात सुद्धा जोरदार फवारण्या सुरू आहेत तेथे डेंग्यू व चिकणगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. चांदवड शहरातील नाल्याकाठच्या भागांमध्ये डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 


काही नागरिकांना ताप व डोकेदुखीचा त्रास होत असून शहरात डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण होण्याची वाट न पाहता चांदवड नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाने शहरात डासांवर फवारणी व घरोघरी ताप व इतर रुग्ण आहेत का याचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.


10 ते 12 दिवसांपासून आमचे प्रतिनिधी सुनील सोनवणे यांनी चांदवड नगरपरिषद स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र नंतर लगेचच औषध संपले की पावडर संपली हे देव जाणे व फवारण्याचे घोडे अजून अडून पडल्याचे चित्र दिसत आहे. तरी चांदवड नगरपरिषदने आता तरी झोपेचे सोंग न घेता फवारण्या करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा