Breakingराष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या पेठ तालुका अध्यक्ष पदी चेतन ठाकरे


नाशिक : देशपातळीवर काम करणारी सर्वात मोठी पत्रकार संघटना राष्ट्रीय विश्वगामी या संघटनेत पेठ तालुक्याचे चेतन ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी चेतन ठाकरेंच्या कार्याला बघुन निवड केली.


सध्याच्या वर्तमानात पत्रकार हा लेखणीचा शिल्पकार आहे. वृत्तवाहिण्यांमुळे देशातील प्रत्येक घराच्या दारात देशातल्या कानाकोपऱ्यात बातम्या व माहिती पोहोचत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात चेतन ठाकरे यांनी मागिल 2 वर्षापासून बातम्यांच्या माध्यमातुन अनेक विकास कामे केली आहेत. तसेच सर्व संघटनांना पाठिंबा दर्शवल्याने समाजाच्या अनेक समस्या सुटल्या आहेत. सर्व पत्रकारांनी, संघटनांनी व लोकप्रतिनिधिंनी एकत्र येऊन विकासासाठी व न्यायासाठी लढले पाहिजे, असा संदेश चेतन ठाकरे यांच्या बातम्यांतून दिसून येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा