Breaking



चिंतामण वडेकर यांची सरपंच सेवा महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड !


घोडेगाव (आंबेगाव) : चिंतामण चंदर वडेकर यांची सरपंच सेवा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


पिंपरगणे गावचे ते सरपंच म्हणून कार्यरत असून संघटनेचे कार्य करण्यास सक्षम असल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, संस्थापक राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी सांगितले.

तालुक्यातील सरपंच बांधवांना न्याय व संघटन मजबूत वाढविण्यासाठी योगदान देणार असल्याचे चिंतामण वडेकर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा