Breaking
कॉ.अण्णाचा स्मृती दिन : मोहा गावचे जलसंधारण बाबतीत काम देशपातळीवर दिशा देणारे : अनिकेत लोहिया


सिरसाळा : मागील अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात असलेल्या दुष्काळावर काम करणाऱ्या मानवलोक आंबेजोगाई येथील संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी मोहा गावात केलेल्या कार्याचे कौतुक केले मोहा गावात करण्यात आलेले जलसंधारणाच्या बाबतीतील काम देशपातळीवर दिशा देणारे कार्य असूनगाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार हा उपक्रम मोहा गावातूनच सुरुवात संस्थेने केलेली आहे.


निस्वार्थ व नि:पक्षपातीपणे केलेल्या कार्याची दखल उशिरा का होईना घेतली जाती असे मत आंबेजोगाई येथील मानव लोकचे कार्यवाहक अनिकेत भैया लोया यांनी केले. महाराष्ट्र शासनाकडून नुकताच मानवलोक या संस्थेला कै. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहाचे संस्थापक सदस्य कॉ.बापूसाहेब अण्णा देशमुख यांच्या 19 स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून ते उपस्थित होते.


महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य कॉ.बापूसाहेब अण्णा देशमुख यांच्या 19व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम तालुक्यातील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे सोमवार दि 19 रोजी संपन्न झाला. कोविड-19 च्या  पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षात्मक उपाययोजना करून मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी मंचावर मानवलोकचे कार्यवाहक अनिकेतभैया लोहिया, सह कार्यवाहक लालासाहेब आगळे, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे  सचिव कॉ.एड.अजय बुरांडे, जेष्ठ संचालक कॉ.सुदाम देशमुख, कॉ.परमेश्वरअप्पा बुरांडे, कॉ.सुदाम शिंदे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.सखाराम शिंदे, संभाजीराव देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर साखरे, उप मुख्याध्यापक सुभाष हरदास आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना लोहिया म्हणाले की, मानवलोक सेवाभावी संस्था व महाराष्ट्र शिक्षण संस्था यांची उद्दिष्टे सारखेच असून निस्वार्थपणे काम करणाऱ्या या संस्था आहेत. प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा विरोध करणे, संघर्ष सोबत रचनात्मक कार्य करणे हेच उद्दिष्टे संस्थेचे असून गरजेच्या ठिकाणी मानवलोक ही संस्था नेहमी लोकसहभाग असल्याशिवाय कार्य करत नाही असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाचा मिळालेला पुरस्कार हा केवळ माझा किंवा माझ्या संस्थेचा नसून मानवलोकच्या या कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांनी आपल्या मनोगतातून शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्याकरिता अडचन करणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा विरोध कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण कॉ. गंगाधरआप्पा बुरांडे व कॉ.बापूसाहेब अण्णा देशमुख  हे आहेत. किसान सभेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर बुरांडे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध मागण्या संदर्भात किसान सभेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना एकजूट करून संघर्ष करून न्याय मिळवून दिला. शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे हाच उद्देश आजच्या स्मृतिदिन आतून सर्वांनी घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी मानवलोकचे सह कार्यवाहक लालासाहेब आगळे, कॉ.बापुसाहेबअण्णा देशमुख यांचे चिरंजीव संभाजीराव देशमुख यांनी ही मनोगत व्यक्त केले.

या स्मृती व्याख्यानमालेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर साखरे, स्वागतमूर्ती अनिकेत लोहिया यांचा व्यक्ती परिचय शाळेतील सहशिक्षक बालाजी कडभाने, सूत्र संचलन अंगद पेड्डेवाड तर आभार व्यक्त पर्यवेक्षक विनायक राजमाने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा