Breaking


आदिवासी संशोधन संस्थेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्तीमुंबई : राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची पुण्यात आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेवर बदली करण्यात आली आहे. या आधी पवनीत कौर या आयुक्त होत्या.


आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६२ साली केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत झाली आहे. परंतु आजपर्यंत आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने होतो आहे.


डॉ. भारुड हे आदिवासी समुदायातून येतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी निश्चितपणे होईल व संस्थेला भरभराटी आणतील, असे बोलले जात आहे.

■ स्वायत्त संस्था म्हणून भविष्यातील वाटचाल व आव्हाने

सध्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही एक महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून या संस्थेची स्थापना सन १९६२ मध्ये केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत करण्यात आली. आदिवासी विषयावरील विविध बाबींवर संशोधन करण्यासाठी देशातील काही आदिवासी बहुल राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

या संस्थेची स्थापना करताना संस्थेचे खालील उदिष्टये निश्चित करुन देण्यात आली होती.

■ संस्थेची उदिष्टये व कार्ये : 

● केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आदिवासी जीवनावर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करणे.

● आदिवासी जीवन व विकास यांचेशी संबधित विषयावर संशोधन करणे.

● आदिवासी विकास विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारीवृंदाकरिता सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच आदिवासी विद्यार्थ्याकरिता सेवापूर्व प्रशिक्षण राबविणे.

● आदिवासीकरिता विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे

● आदिवसी कला व संस्कृती जतन करण्याकरिता आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय चालविणे, हस्तकला प्रदर्शनाचे विविध शहरी भागात आयोजित करणे तसेच आदिवासी जीवनावर लघुपटाची निर्मिती करणे.

● महाराष्ट्र राज्यात क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा