Breaking
दिघी : पुस्तक दान उपक्रमाला दिघीतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद...!


दिघी : घेऊ पुस्तक दान, करु वही प्रदान या उपक्रमाच्या माध्यमातून दिघी विकास मंचाच्या आवहानाला दिघीतील नागरिकांनी प्रतिसाद देत ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या हेतूनेच अनेक पालकांनी व विद्यार्थांनी इयत्ता पहिली ते दहावी मराठी व इंग्रजी माध्यमांची असंख्य पुस्तके दान केली.


पुस्तक दान उपक्रमाच्या माध्यमातून नक्किच गरजू, होतकरु विद्यार्थांच्या पंखानां शिक्षणासाठी बळ मिळणार आहे. या ज्ञानप्रसार पुण्यकार्यातील पालकानां व विद्यार्थांना मंचाच्या वतीने "ज्ञानप्रसार दातृत्व प्रमाणपत्रक" व एक डझन वहीचा संच प्रदान करण्यात आला.

यावेळी दिघी विकास मंचाच्या वतीने दिघीतील नागरिकाना आवहान करण्यात आले कि, विद्यार्थांसाठी पहिली ते दहवी मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय पाठ्यपुस्तके शिक्षणासाठी विनाशुल्क मिळतील ..!

या कार्यक्रमासाठी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, सल्लागार सुनिल काकडे, सुखदेव वानखडे, धनाजी खाडे, अभिमन्यु दोरकर, पांडूरंग म्हेत्रे, पुडलीक सौंदाणे, ज्ञानेश आल्हाट, प्रंशात कुर्हाडे उपस्थित होते तर दत्ता घुले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. विकी आकुलवार यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा