Breaking


डॉ. कुंडलिक केदारी यांच्यासह अन्य मान्यवरांना निळू फुले कलागौरव पुरस्कार जाहीर



पुणे : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्यावतीने विविध कला क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येणारा 'निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार' यंदा दिग्दर्शक निर्माता डॉ. कुंडलिक केदारी, साहित्य क्षेत्रातील डॉ. राजेंद्र कुंभार, पत्रकार सुनील माने आणि सामाजिक क्षेत्रातील रुक्मिणी नागापुरे यांना जाहीर झाला आहे.


विश्वकर्मा आरोग्यरत्न पुरस्कार क्रिकेट प्रशिक्षक सुनील कांबळे व चंद्रकांत पवळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी ( ता .१६ ) दुपारी बारा वाजता दांडेकर पूल येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात होणार आहे.


माजी रणजी क्रिकेटपटू शाम ओक आणि वरिष्ठ पत्रकार शाम दौंडकर यांच्या हस्ते आणि चंद्रकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू गरुड यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा