Breakingअखेर बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पार पडला, जातपंचायतींसह धार्मिक संघटनांचा कडवा विरोध


नाशिक : नाशिक येथे गेल्या महिन्यापासुन रसिका आडगावकर आणि असिफ खान यांच्या आंतरधर्मिय विवाहाची चर्चा चालू होती. त्यात अनेक वादही झाले. रसिकाच्या जातीची जातपंचायत व काही धार्मिक संघटनांनी या विवाहास कडाडून विरोध केला होता. पण तरीही हा विवाह सोहळा आज (२२ जुलै) हाॅटेल एस एस के येथे अगदी मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा पार पडला. 


हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी हजर होते. मुलाचे मामा म्हणून अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी मामाचे विधी पार पाडले. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. अनेक पुरोगामी संघटनांनी या विवाहाला पाठींबा दर्शविला होता. कुटुंबियांची नामदार बच्चू कडू यांनी भेट घेतली होती. अंनिसच्या नाशिक येथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कुटुंबियांची भेट घेतली होती. पोलीस आयुक्तांना संबंधित विवाहाला विरोध करणारांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. 

"या लग्नास मुलीच्या जात पंचायतने विवाह सोहळा करण्यास प्रखर विरोध केला होता. विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. असे करणे म्हणजे जात पंचायतच्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा भंग आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर विरोध मावळला व विवाह सोहळा शांतपणे उत्साहात पार पडला."

- कृष्णा चांदगुडे, कार्यवाह 
  महाराष्ट्र अंनिसचे जात पंचायत मूठमाती अभियान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा