Breaking
पोलीस दलात खळबळ ! चांदवड तालुक्यात 2 पोलीस लाचलूचपतच्या जाळ्यातचांदवड / सुनील सोनवणे : चांदवड तालुक्यातील दोन पोलीसांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.


नाशिक येथील युनिटला तक्रारदार रा. पिंपळगाव यांच्या तक्रारी नुसार आरोपी नामदेव महादू राठोड - 51 पोलीस नाईक, नेमणूक वडनेर भैरव पोलीस  स्टेशन, नाशिक रा. मु. पो. नवापुर तालुका. चांदवड  जिल्हा .नाशिक तर मधुकर अंबादास जाधव, वय 53 पोलीस नाईक, नेमणूक वडनेर भैरव पोलीस स्टेशन, नाशिक रा. मु.पो. बोराळे तालुका चांदवड जिल्हा  नाशिक यांनी 15 हजार लाचेची मागणी केली होती. व 10 हजार लाच स्विकारल्या प्रकरणी रंगेहाथ पकडले. 

 

सविस्तर वृत असे की, तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्य़ात मदत करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवा क्रमांक 1 यांनी 15 हजार  लाचेची  मागणी  शकरून  नमूद दोन्ही आरोपीं यांनी आज रोजी 10 हजार रुपये लाच रक्कम स्विकारली.                                      


या प्रकरणी सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक चे पोलीस निरीक्षक अनिल बागूल, सह अधिकारी संदिप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाचे पोलिस नाईक गरुड, पोलिस नाईक अहिरराव, पो ना.देशमुख, पो.हवा.पळशीकर, पो.शि.जाधव व ला. प्र. वि. नाशिक यांचा सहभाग होता.


याकामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस उप अधिक्षक सतीश भामरे यांनी मार्गदर्शन केले.                                                       

नागरिकांना आवाहन !


सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा