Breaking
भारतीय कामगार न्याय सभा युनियनची कार्यकारणी जाहीर, नाशिक जिल्हाध्यक्षपदी किरण चंद्रमोरे यांची नियुक्तीनाशिक : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन प्रणीत भारतीय कामगार न्याय सभा या सुरक्षारक्षक व माथाडी घरेलू कामगार बांधकाम कामगार तसेच निमशासकीय शासकीय कामगार युनियनच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी किरण चंद्रमोरे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांनी केली. यावेळी चंद्रमोरे यांचा संसारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


नवीन नियुक्तीनुसार जिल्हाध्यक्ष किरण चंद्रमोरे, सरचिटणीस राजेश काजळे, उपसरचिटणीस अजीत गुजर, नाशिक शहर उपाध्यक्ष भगवान काजळे, नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष एकनाथ टोपले, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मनीष भालेराव, नाशिक जिल्हा उपकार्याध्यक्ष दिपक बनसोडे, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत भालेराव, नाशिक जिल्हा सहकोषाध्यक्ष रविंद्र पगारे, नाशिक जिल्हा संघटक संदीप निकम, नाशिक जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड सुनील गांगुर्डे, नाशिक जिल्हा बांधकाम कामगार विभाग प्रमुख अमोल चंद्रमोरे तर सदस्यपदी रामदास गांगुर्डे, संतोष शिंदे, सुनील बागूल, ताराचंद आहेर, ज्ञानेश्वर आवारे, नवनाथ गायकर यांची निवड करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा