Breaking
प्रसिध्द फोटो पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये वृत्तांकन करताना मृत्यूकाबूल : अफगाणिस्तानात सध्या तालिबान आणि सैन्यामध्ये लढाई सुरु आहे. अफगाणिस्तावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी तालिबानने ही लढाई सुरु केली आहे. याचे वृत्तांकन करताना एका प्रसिद्ध भारतीय फोटो पत्रकाराचा मृत्यू झाला आहे.


दानिश सिद्दिकी असे या पत्रकाराचे नाव असून ते अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्दक जिल्ह्यात अफगाण स्पेशल फोर्सेस संबंधी वृत्तांकन करत होते.


सिद्दीकी आणि त्याचा सहकारी अदनान अबीदी हे रोहिंग्या निर्वासिताच्या संकटाविषयीच्या अहवालासाठी २०१८ मध्ये फीचर फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्कार जिंकणार्‍या रॉयटर्स संघाचा एक भाग होते. दानिश यांचे अनेक फोटो चर्चेचा विषय ठरलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा