Breakingआदिवासी पेसा गावांमध्ये उत्कृष्ट पेसा अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामसेवकांला मिळणार पुरस्कार !


पुणे : राज्यात लागू असलेल्या पेसा कायद्याची उत्तम अंमलबजावणी करून ग्रामसभा सक्षम करणाऱ्या ग्रामसेवकांना बहुरंगी, पुणे तर्फे पेसा पुरस्कार देण्यात येणार आहे. कामाचे वर्ष २०१८ - २०१९ हे मानले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह असे असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान  प्रदान करण्यात येणार आहे.


२१ एप्रिल २०१५ चार शासन निर्णय आणि २१ आगस्ट २०१५ शासन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पेसा ग्रामपंचायती ना प्राप्त झालेल्या ५ % अबंध निधीमधून शासन निर्णय यात नमुद केल्याप्रमाणे केलेल्या विकासकामांचा दस्तऐवज या सह प्रस्ताव करावा. ग्राम सभा सक्षम करणेसाठी राबविले गेलेले उपक्रम, पेसा व वनहक्क कायदा अंमलबजावणी, आदिवासी रूढी परंपरा, कला संस्कृती संवर्धन आणि जतन करण्यासाठी केलेले कामाचा देखील पुरस्कारात विचार केला जाणार आहे.


प्रस्ताव व दर्शविल्या कामाची शहानिशा आणि सत्यता निवड समिती कडून तपासून अंतिम  निवड केली जाईल. तरी पेसा ग्राम सेवकांनी आपले प्रस्ताव १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत  अध्यक्ष, बहुरंग पुणे २४/५९९ पावन सहकारी हौसींग सोसायटी, गोखले नगर, पुणे - ४११०१६ या पत्त्यावर पाठवावेत.


अधिक माहिती साठी फोन ०२० २५६५०६२५ मो. ९४२२३१८३१८ डॉ. कुंडलिक केदारी पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा