Breaking


'त्या' फुकट बिर्याणी प्रकरणाची गृहमंत्र्यांनी घेतली दखल, 'त्या' ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ


पुणे : कालपासून सोशल मिडीयावर पुणे पोलीस दलातील महिला अधिकार्याची ऑडिओ व्हायरल होत असल्याने क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. 


या ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे ? अशी विचारणा करताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. पुणे पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्या ऑडीओ मध्ये पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं, म्हणत होती. यावर पोलीस कर्मचारी एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं सांगतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत. नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे असं सांगतो. तसंच ऑईली बिलकूल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे. कलर वगैरे नसतं त्यात असंही सांगतो.

यावर महिला अधिकारी बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या मॅडमनं सांगितलं म्हणून .... मी बोलू का पीआयला असं विचारतात . यावर कर्मचारी नाही मॅडम करतो मी असं सांगतो. "त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण ... आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण ? " अशी विचारणा महिला अधिकारी करते. 

"आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो, "असं पोलीस कर्मचारी सांगतो. यावर महिला अधिकारी मग तुम्ही काय करायचे ? असं विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी आपण कॅशच करायचो मॅडम असं सांगतो.

" तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून ... तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं ? नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते, "असं महिला अधिकारी यावेळी त्या कर्मचाऱ्याला सांगते. यानंतर पोलीस कर्मचारी येस मॅडम . मी सांगतो असं उत्तर देतो. ऑडिओ क्लिपच्या शेवटी महिला अधिकारी म्हणतात की, " त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का ? .. मला माहीत नाही ". 

पुणे येथे पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले, "या प्रकरणाची ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा