Breaking


लाँच होण्यापूर्वीच 'ओला इलेक्ट्रिक स्कुटरला' प्रचंड प्रतिसाद !


न्यूज डेस्क : भारतात लॉन्च होण्यापूर्वीच "ओला स्कुटरला"प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वास्तविक पाहता! या उत्पादनात अनेक नामांकित कंपन्या आहेत. मात्र असं असलं तरी अनेक सेगमेंट फर्स्ट फिचरसह बाजारात येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरच्या शैलीपासून तंत्रज्ञानापर्यंत कंपनीने बरेच काम केले आहे.

       
ओला ने अशी काय जादू केली काही माहीत नाही पण भारतात लॉन्च होण्यापूर्वीच "ओला इलेक्ट्रिक या दुचाकीची लोकप्रियता" वेगळ्या पातळीवर पोहचली आहे. इलेक्ट्रिक गाडी म्हटलं की ती लोकल साठीच! परंतू ही गाडी लांबपल्ल्यासाठी वापरली जात आहे! यासाठीच ओला कंपनी स्वतःचं इलेक्ट्रिक चार्जर स्टेशन व स्वतःचं हायपर चार्जिंग नेटवर्क तयार करणार आहे! ज्याच्या मदतीने "ओला इलेक्ट्रिक स्कुटर" (दुचाकी) चालक त्याच्याकडील दुचाकीला अवघ्या काही मिनिटात लक्षणीय अंतरावर नेऊ शकणार आहे. ओला देशातील ४०० शहरांमध्ये आपले हायपर चार्जिंग स्टेशन स्थापित करेल. हे हायपर चार्जर कोणतीही वेळ न घालविता चार्ज करेल!

संपादन - रवींद्र कोल्हे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा