Breaking


राणी जाधव यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार


घोडेगाव : फुलवडे ता .आंबेगाव येथील नामदेवराव मारुती नंदकर माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षिका राणी तुकाराम जाधव यांना पुण्यातील सदाशिव पेठेतील मुक्तांगण प्रशालेत आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . अमोल निकाळजे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला . 


कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी उत्कृष्ट काम केल्याने जाधव यांना राजमुद्रा प्रिंट, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गौरविण्यात आले .शिक्षिका राणी जाधव यांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रम, राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी, निबंध ,वक्तृत्व ,चित्रकला , कोलाजकाम या ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले होते .त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन 'अनलॉक लर्निंग' यासारखे उपक्रम राबविले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा