Breaking
बंद पथदिवे तात्काळ चालू करून बंद पथदिव्याचे रिडिंग होत असल्याने चौकशी करा - मनसे


रामटेक : पापदुप वार्ड ते रामटेक गडमंदिर वरील बंद पथदिवे तात्काळ चालू करून बंद पथदिव्याचे मिटर रिडिंग होत असल्याने चौकशी करण्याची मागणी मनसे तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांनी नगरपरिषद कार्यासिन अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, रामटेक नगरपरिषद अंतर्गत असलेल्या पापदुप वार्ड ते रामटेक गडमंदिर परिसरातील पथदिवे गत काही काळापासून बंद असून, अधिक माहिती घेतली असता सदर भागात रस्त्याचे खोदकाम करून डांबरीकरण करतेवेळी पथदिव्यांचे भुमिगत केबल रोड बनविणाऱ्या कंत्राटदाराव्दारे तोडण्यात अथवा हटवण्यात आले आहे. ज्यामुळे पथदिवे बंद पडलेली असून, सायंकाळी फेरफटका  मारायला जाणाऱ्या नागरिकांना ज्यात प्रामुख्याने महिलांना परिसरात पडणाऱ्या गडद अंधारामुळे भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

तसेच पथदिवे बंद असूनही पथदिव्यांचे मिटर रिडिंग दाखवून बिल वसूली होत असल्याचे नगरपरिषदेत कानावर येत आहे. रामटेक नगरपरिषदेत नागरिकांच्या सोई-सुविधेवर लक्ष न देता कंत्राटदारांना फुकटचे जेवायचे आवतन दिल्या जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि खपवून घेणार नाही. दोन दिवसात बंद पथदिवे चालू झाले नाही व कंत्राटदाराच्या चुकीच्या कामाची तथा बंद पथदिव्यांचे मिटर रिडिंग दाखवून नागरिकांच्या कर स्वरूपी पैशाची उधळपंट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही दुंडे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा