Breaking
जुन्नर : "प्लॅस्टिकचा वापर टाळा; चिमुकल्यांनी अनोळख्या पध्दतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश !

 


जुन्नर : प्रदूषणाचा सामाना सारं जग करीत आहे. याकडे लक्ष वेधण्याचे काम जाणत्यांबरोबर चिमुकलेही करत आहेत. जुन्नर तालुक्यात पेपर बॅग डेचे औचित्य साधून "लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आयोजित केलेल्या पेपर बॅग मेकिंग स्पर्धेत १ हजार २०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.


तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आज सर्वत्र प्लॅस्टिकच्या अति वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्याचाच परिणाम परिसरात होतो. या प्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी "विघटनशील पेपर बॅग'चा" वापर वाढवावा, असा संदेश देत चिमुकल्यांनी स्पर्धेची पुरेपूर संधी लुटत कागदी पिशव्या बनविल्या आणि स्पर्धेच्या निमित्ताने समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला.


यावेळी लिओ क्लबच्या अध्यक्षा डॉ.धनश्री गुंजाळ म्हणाल्या की, प्लॅस्टिक'च्या प्रदूषणामुळे जीवसृष्टी अक्षरशः धोक्यात आली आहे. यावर मात करण्यासाठी विघटनशील कागदी पिशव्यांचा वापर वाढवा या उद्देशानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पेपर बँग तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. परीक्षक म्हणून अंजली गुंजाळ, नंदा शिंदे यांनी काम पाहिले. डिस्ट्रिक्ट लिओ क्लबचे संदीप मुथ्था, श्वेता शिंदे, डॉ.प्रिया जठार यांनी स्पर्धेचे नियोजन केले तर स्पर्धकांची माहिती आयोजक डॉ.धनश्री गुंजाळ यांनी दिली.


■ विषयनिहाय पहिले तीन क्रमांक : 


■ छोटा शिशु गट - 


● विषय - पक्षी : सेरेना सोनवणे, प्रथमेश खुळे, अन्वेष चव्हाण, ओवी मेहेत्रे


● विषय - प्राणी : जुई भोर, समर्थ नलावडे, अन्विता घोलप, शौर्य गीसावी


■ इयत्ता पहिली ते चौथी -


● विषय - कार्टून : दर्श चोरमुंगे, अलोक मोरे, अवनी शेलार 


● विषय - फुले : शर्वरी हिंगे, अमृता घोलप, पूर्वा कुटे


■ इयत्ता पाचवी ते दहावी गट -


● विषय - स्वतःची कल्पना : श्रुती साबळे, शर्वरी भगत, आर्यमा भार्गव, तनुष्का नेहरकर


● विषय - सिझन : गिरीजा औटी, शुभांगी गोसावी, गायत्री फलके, अनुष्का कानडे


■ लिओ क्लब मेम्बर गट : साक्षी चोरडिया, जुईली गुंजाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा