Breaking
जुन्नर : गोळेगाव येथे ५ चार चाकी गाड्यांचा अपघात, व्हिडीओ पहा !


जुन्नर / नाजीम गोलंदाज : गोळेगाव येथे पोलीस पाटील यांच्या बंगल्यासमोर ५ चार चाकी गाड्यांचा अपघात झाला. किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 


सविस्तर माहिती अशी की, सायंकाळी ६ वाजता ओतूरकडून जुन्नर ला जाणाऱ्या गाडी चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या फॉरचुनर गाडीला कट मारल्यामुळे पाठीमागून आलेल्या अरटिका गाडीने फॉरचुनर गाडीला धडक देऊन सदर गाडी रस्त्या उतरून द्राक्षे बागेत गेली. त्यामुळे गाडीचे व बागेचे मोठे नुकसान झाले आहे.


जवळच राहणाऱ्या पोलीस पाटील व इतर लोकांनी गाडीतील लोकांना मदत करत असताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मारुती कंपनीच्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या गाडीने जोरात धडक दिली. दुर्दैवाने कोणालाही दुखापत झाली नसून चारही गाड्याचे व द्राक्षे बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ठिकाण अपघाताचे केंद्र बनवले असून अनेक अपघात याठिकाणी झाले आहेत. अनेक वेळा मागणी करूनही ह्या ठिकाणी स्पिड ब्रेक बसविण्यात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा