Breakingजुन्नर : माणकेश्वर येथे सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा संपन्न


जुन्नर (पुणे) : श्री क्षेत्र माणकेश्वर ता. जुन्नर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.


रामचंद्र मुक्ताजी कोरडे यांनी 512 आर्मी बेस वर्कशॉप पुणे येथून आपली सेवा पूर्ण केली, तर कुंडलिक शिवराम मुठे यांनी पाटबंधारे विभाग नारायणगाव येथून आपली सेवा पूर्ण केली.सेवानिवृत्त झालेल्या दोघांनी आपल्या सेवेतील सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत कशाप्रकारे कार्य केले आणि सेवेतील अनेक अनुभव सांगितले. या वेळी ग्रामस्थांनी आणि महिलांनी दोन्ही सत्कारमूर्तींचे औक्षण व सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प रेवजी महाराज शेळकंदे, ग्रामपंचायत चावंडच्या उपसरपंच माधुरी कोरडे, पोलीस पाटील रोहिदास कोरडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवारी, पेसा अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडे, खडकुंबे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दशरथ चव्हाण, माजी उपसरपंच नामदेव सिताराम कोरडे, किसान सभेचे तालुका सदस्य कोंडीभाऊ बांबळे, अनाजी मुंढे त्याच बरोबर वारकरी मंडळी, महिला मंडळी आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतिश कोरडे यांनी केले, तर आभार सुनील कोरडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा