Breaking
जुन्नर : श्री क्षेत्र कुकडेश्वर येथून राजकीय हालचालींना वेग


जुन्नर (पुणे) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ आल्यामुळे तालुक्यातील राजकारण तापले आहे. या राजकारण जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पुढारी टिका - टिप्पणी मुळे नेहमी चर्चेत असतात. 


सध्या आदिवासी समाजाचे प्रश्न, हिरडा फँक्टरी चे प्रलंबित काम या मुद्यांना घेऊन राजकीय पुढारी एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. आता राजकीय पुढाऱ्यांनी आपला मोर्चा आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुकडेश्वर कडे वळवला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, काळू शेळकंदे, मारुती वायाळ यांनी श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे शपथ घेत घेतली. यावेळी हिरडा फँक्टरी, आदिवासी समाजाचे प्रश्न व श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदीराचे काम पुर्ण करण्याचा निश्चय केला. व वेळेप्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

तोच पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी आदिवासी प्रश्न, हिरडा फँक्टरी बाबत कार्यकर्त्यांंसह श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे दि. ५ जुलै रोजी शपथ घेतली. यावेळी गागरे आणि समर्थकांनी देवराम लांडे यांच्यावर जोरदार टिका करत आदिवासी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सत्ता आणि पदासाठी चाललेले राजकीय नाट्य कोणते रंग धारण करतंय हे येणार काळाच ठरवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा