Breaking


जुन्नर : तालुक्यातील भूस्खलन होणाऱ्या भागाची प्रशासनाकडून पाहणी


जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी जमीन खचल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


तालुक्यातील तळमाची येथील दौड्या डोंगराच्या पायथ्याशी काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या असून जमीन खचली आहे, त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


राज्यात भूस्खलनाच्या घटना होत असल्याने जुन्नर तालुक्यातील तळमाचीसह मांगणेवाडी, भिवाडे बुद्रुक, कोल्हेवाडी येथे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली. 


दरम्यान, तळमाची येथील दौड्या डोंगर या ठिकाणी २००५ साली भूस्खलन झाले होते, त्यावेळी येथील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा पासून या वाडीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र अद्यापही पुनर्वसनाचे काम होऊ शकले नाही.


तसेच, गेल्या वर्षी भिवाडे बुद्रुक या गावातील धरणालगत असणाऱ्या जमिनीला भेगा पडल्याची घटना घडली होती, त्यावेळी नवीन बांधलेल्या एका घराचे देखील मोठे नुकसान झाले होते.


अधिक वाचा :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा