Breakingजुन्नर : आकाश माळी यांची वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी निवड


पुणे / पौर्णिमा बुचके : पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील सर्पमित्र आकाश प्रकाश माळी यांची नुकतीच वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या जुन्नर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून वन्य पशु पक्षी संरक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा बडदे व सचिव विनायक बडदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.


पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील सर्पमित्र आकाश माळी यांनी आजपर्यंत असंख्य सापांसह काही वन्य जीवांना जीवदान देण्याचे विशेष कार्य केले आहे. तसेच जुन्नर वनविभाग मार्फत जुन्नर रेस्क्यू टीम सदस्य म्हणून बिबट्या विषयी जनजागृती तसेच रेस्क्यू करण्याचे जोखमीचे काम केले आहे. आपल्या सहकार्याच्या मदतीने सापांची हत्या करणाऱ्या व्यक्तीसह साप चावल्या नंतर अंधश्रद्धा द्वारे मंत्राचा वापर करणाऱ्या गुन्हे दाखल केले आहे. नागपंचमी निमित्तानं सापांचे खेळ करणाऱ्या गारुडी लोकांकडून साप ताब्यात घेऊन पुन्हा निसर्गात मुक्त करण्याचे काम केले आहे. 

असंख्य वन्य जीवांना जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत नुकतीच त्यांची वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या जुन्नर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबत वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा बडदे यांनी माळी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. 

याप्रसंगी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थचे उपाध्यक्ष प्रवीण पवार, सदस्य दीपक माळी, अनिकेत रावळे, पुजा मांडे, ऋषी गायकवाड, अक्षय वायकर, वैभव गावडे, तसेच पिंपळवंडी माजी पोलीस पाटील भिकाजी ताथवडे, डॉ. खिळे, सिद्धार्थ कसबे, मंगेश बारवकर यांसह आदी मान्यवर तसेच सर्पमित्र उपस्थित होते.

तसेच निवड झाल्याने जुन्नर तालुक्यामध्ये वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वन्य जीवांच्या रक्षणासाठी तसेच वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्पमित्र आकाश माळी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा