Breaking




जुन्नर : आदिवासी महिलांची फसवणूक करणारा जेरबंद, पाच दिवसाची कोठडी



जुन्नर / रफिक शेख : काम देतो असे सांगून आदिवासी महिलांचा फसवणूक करणारा गुन्हे अखेर जेरबंद करण्यात जुन्नर पोलीस स्टेशनला यश आले. 


बीड जिल्हा येथे जाऊन आरोपी नंबर एक किशोर वशिष्ठ काळे यास मोबाईल लोकेशन द्वारे शिताफीने पकडून त्यास आज 18 जुलै 21 रोजी जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष हजर करून त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. 


या गुन्ह्यामध्ये जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि.नं 277/2021 भा.द.वि.कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यामध्ये फिर्यादी सुरेखा महेंद्र मडके वय. 32 ( रा. तांबे) यांनी त्यांच्या गावातील 2 बचत गटातील महिलांची जनसेवा लघु उद्योग विकास महाराष्ट्र या नावाने बचत गटातील महिलांना हळद पावडर मिरची पावडर जिरे मोहरी वगैरे वस्तूंची अर्धा अर्धा किलो पॅकिंग करून द्यायची आहे. कच्चा पिशव्या आम्ही देणार असे म्हणून कंपनीत रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये अशी फसवणूक केली होती. तसेच तांबे गावाबरोबरच अजनावळे, सोमतवाडी, तांबे, आंबे हातवीज, माणिकडोह अशा गावातील महिलांची देखील फसवणूक करण्यात आली होती.   


आरोपी किशोर काळे व इतर दोन इसम व  दोन महिला यामध्ये सहभागी आहेत. हे मिळून मोबाईल द्वारे संपर्क साधून फसवणुकीची काम करत आहेत. यातील आरोपी नंबर एक यास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय पाटील, महिला पोलीस हवालदार मनीषा मुकुंद ताम्हाणे, पोलीस अंमलदार अमोल शिंदे, पोलीस अंमलदार भरत सूर्यवंशी यांनी बीड जिल्हा येथे जाऊन आरोपी नंबर एक किशोर वशिष्ठ काळे यास मोबाईल लोकेशन द्वारे शिताफीने पकडून त्यास आज 18 जुलै 21 रोजी जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष हजर करून त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. 


या घटनेचा जुन्नर पोलीस स्टेशनकडून कसोशीने तपास चालू आहे. या फसवेगिरी मध्ये किती आरोपी सहभागी आहे, त्याचा तपास चालू आहे. 


जुन्नर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विकास जाधव यांनी जनतेला आवहान केले आहे की जुन्नर परिसरामध्ये अशाप्रकारे फसवेगिरी चे प्रकार घडले असतील तर जुन्नर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक 02132222033 / 8329700136 / 9967913607

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा