Breakingजुन्नर : चेअरमन मनोहर रढे यांचे दु:खद निधन !


जुन्नर : निमगिरी गावचे माजी सरपंच, निमगिरी दूध डेअरी चे चेअरमन मनोहर बाबुराव रढे यांचे आज (दि.१८) पहाटे ५ वाजता दु:खद निधन झाले. ते ८० वर्षाचे होते.


मनोहर रढे हे निमगिरी गावचे प्रथम सरपंच होते. या ग्रामपंचायतीमध्ये सध्याच्या ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे - खैरे चा देखील समावेश होता. यशस्वी कारकीर्द अशी वाटचाल करणारे मनोहर रढे यांचे नाव पंचक्रोशीत सर्वपरिचित आहे.

मनोहर रढे जुन्या पिढीतील मँट्रिक पास होते. राजकारणाबरोबरच त्यांचा सामाजिक क्षेत्रातही दांडगा संपर्क होता. ते एक नामवंत कुस्तीपटू म्हणून देखील परिचित होते.

त्यांच्या पाश्चात्य राजू, अशोक ही दोन मुले, तसेच तीन मुली, सुना नातवंडे असा विस्तीर्ण परिवार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा