Breaking
जुन्नर : कामाचे आमिष दाखवून आदिवासी भागातील गोरगरीब महिलांची केली फसवणूक, तालुक्यातील दुसरी घटना


जुन्नर : तालुक्यातील आदिवासी भागातील गोरगरीब महिलांची कामाचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे. गेली कित्येक दिवस हाताला काम नसल्यामुळे रोजगाराच्या शोधात असणाऱ्या या महिला या आमिषाला बळी ठरल्या आहेत. रोजगार नसल्यामुळे गावात आलेल्या बोगस संस्था चालक यांनी नोंदणी शुल्क भरून नोंदणी करा तुम्हाला जनसेवा लघु उद्योग मार्फत काम मिळवून देतो असे खोटे सांगून नोंदणी शुल्क भरण्यासाठी भाग पाडले.


जुन्नर तालुक्यातील तळेचीवाडी भागात ( दि. १७ ) रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास जनसेवा लघुउद्योग विकास ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या नावाखाली पुरुष व काही मुली आल्या होत्या. या चारचाकी वाहनातून आलेल्या पुरुषांनी बचत गटाच्या अध्यक्ष सचिवांना भेटायचे म्हणून सांगितले त्यावेळी त्यांनी काही घरी जाऊन थेट स्थानिक महिलांना भेटून आम्ही जनसेवा लघुउद्योग विकास ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या पोषण आहाराचे काम करणार असून त्यासाठी आम्हाला धान्य व काही वस्तू पॅकेजिंग करून हव्या आहेत असे सांगण्यात आले. त्यासाठी अगोदर बचत गटाच्या अध्यक्ष सचिवांची नोंदणी करण्यासाठी सांगितले मात्र नंतर ते बोगस व्यक्ती सर्वच महिलांची नोंदणी करून घ्यायला लागले. तसेच नोंदणी शुल्क म्हणून तीनशे रुपये जमा करा अशी बतावणी केली. आधीच हाताला काम नसल्याने हताश झालेल्या स्थानिक ३० महिलांनी त्या बनावट व्यक्तींकडे हजारो रुपये जमा केली. 


आम्ही तुम्हाला चार दिवसात साहित्य आणि मशीन देतो असे आमिष दाखवले आणि पसार झाले. आज (दि.१३ जुलै) पंधरा दिवस झाले तरी पण ते आले नाहीत. त्यांचा मोबाईल नंबर लागतो पण फोन उचलत नाहीत. जास्त वेळा फोन केला तर नंबर ब्लॉक करतात. तेव्हा अशा माणसांपासून सावध रहा आणि अशी माणसे कोणाला आढळली तर त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करा.
सदर इसम
या अगोदर देखील फसवणुकीच्या घटना : 

या अगोदर जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथे दि. १५ जानेवारी २०२१ रोजी देखील "जनसेवा लघु उद्योग विकास (महाराष्ट्र)" या संस्थेचे काही लोक आले होते. परंतु हे बोगस लोक असल्याचा संशय नागरिकांना आला होता. नागरिकांनी उलट तपासणी केल्यानंतर या इसमानी पळ काढला होता. 

या संस्थेची संस्थेची अधिक माहिती अशी की, जनसेवा लघु उद्योग विकास (महाराष्ट्र)" हे संस्थेचे नाव गुगलवर सर्च केल्यानंतर या संस्थेने या अगोदर काही महिलांची फसवणूक केल्याच्या बातम्या सर्च इंजिन मध्ये आल्या.

तालुक्यात याआधी देखील असे प्रकार झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर फसवणूक झालेल्या पैकी अनेकांनी यावर गप्प राहणे पसंत केले आहे.

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना दररोज तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास करून रोजगारासाठी इतरत्र ठिकाणी जावे लागत असते. त्यामुळे गावातच रोजगार मिळेल या आशेने ग्रामीण भागातील असंख्य महिलांनी नोंदणी केली. मात्र नंतर आपली फसवणूक झालीची चर्चा गावात रंगली त्यावेळी अनेकांनी मनस्ताप व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा