Breaking
जुन्नर : मुथाळणे तलाठी सजेचे कार्यालय मांडवे येथे स्थापित करण्याची मागणी


जुन्नर (पुणे) : मुथाळणे (ता. जुन्नर) तलाठी सजेचे कार्यालय मांडवे येथे स्थापित करण्याची मागणी आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वातंत्र्य नंतर देखील कोपरे, जांभूळशी, मांडवे,  मुथालने ही गावे समाविष्ट बारा वाड्या वस्त्या दळणवळण पायाभूत सुविधा पासून वंचितच आहे. जुन्नर हे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी तर शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील ही दुर्गम गावे आहेत.

उपहासकपणे का होईना आपल्या जिल्ह्याला "पुणे तिथे काय उणे" असं बोलले जाते. मात्र गेल्या सत्तर वर्षे इथे मलभुत सुविधा मिळालेल्या नाहीत. फक्त पंचवार्षिक निवडणूक आली की सर्वच नेते स्टंट बाजी करत फिरकत असताना आढळतात. सफेद रंगाची कपडे घालून पुढारी दिसले की समजायचे निवडणूक आली आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

निसर्गाने भरभरून दिलेले आहे. तरीही सर्वच बाबतीत सुविधा पासून वंचितच आहे. हा परिसर तसा चहुबाजूंनी डोंगररांग असलेला भाग आहे. या भागात तलाठी कार्यालय सुरू करण्यासाठी ज्या अडचणी वर बोटं ठेवले जात होते ते म्हणजे मोबाईल रेंज उपलब्ध होत नव्हती. हा अडथळा आता दूर झाला आहे. त्यामुळे या प्रश्न गती मिळणे अपेक्षित असल्याचेही आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठानने म्हटले आहे.

या भागातील गावे पेसाअंतर्गत येतात. परंतु तलाठी कार्यालय हे मूळ गाव पासून २५ किमी अंतरावर ओतूर (ता.जुन्नर) ठिकाणी आहे. शासकीय कागदपत्रं मिळविणेसाठी वेळ व पैसा वेळ जात असल्याचे ही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तलाठी कार्यालय कारभार हा मांडवे येथून तात्काळ सुरू करण्याची मागणी आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान उमेश माळी, राहुल कवठे, दीपक हगवणे, किसन माळी, पांडुरंग मुठे, राजेंद्र ठोगिरे, संजय कुडल, रामदास दाभाडे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा