Breaking


जुन्नर : देवराम लांडे यांच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाकडून तीव्र निषेध, माफी मागण्याची मागणी

 


जुन्नर : "माळ काढून अंडी खाल्याच्या" या जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पांडुरंग महाराजांबद्दल बोललेल्या या वक्तव्याचाही निषेध करतो, देवराम लांडे यांनी आपल्या जिभेचा तोल सांभाळावा असेही, वारकरी प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष संतदास महाराज मनसुख म्हणाले. ते प.पु.गुरुवर्य वै. कोंडाजी बाबा ढेरे आश्रम जुन्नर येथे आयोजित बैठकीत आज (दि.९) बोलत होते.


देवराम लांडे आणि पांडुरंग महाराज लांडे यांच्यामध्ये वैयक्तिक गाव पातळीवर राजकारण असेल. एकमेकांवर चिखलफेक केली असेल, परंतु राज्यकर्त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात अपशब्द वापरले तर कदापिही सहन करणार नाहीत, देवराम लांडे यांनी शब्द मागे घेऊन वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी वारकरी प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्याचे पोपट महाराज खंडागळे यांनी केली आहे. यावेळी अन्य वारकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा