Breaking


जुन्नर : 'आपला भाऊ प्रतिष्ठान' च्या वतीने आयटीआय कातकरी वस्ती येथे किराणा किटचे वाटप !


जुन्नर : "आपला भाऊ प्रतिष्ठाण"च्या माध्यमातून जिल्हा परिषद निरगुडे-पाडळी गटातील आय टी आय-कातकरी वस्ती येथे सर्व कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले.


या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे, शिक्षक संघटनेचे नेते संतोष ढोबळे, युवा नेते बाळासाहेब सदाकाळ, खामगाव चे उपसरपंच अजिंक्य घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विवेक पापडे, शुभम दातखिळे यांचा वाढदिवस ह्या गोर-गरीब लोकांमध्ये साजरा केला.

"कोरोनाच्या संकट काळात गोर-गरीब लोकांसाठी काम करत असताना प्रमोद तांबडे, अथर्व ढोबळे, शुभम आंभरे, ओंकार पानसरे, निखील पठारे, बिलाल गोल्हे, हेमंत जाधव, अंगणवाडी सेविका ठोंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर युवा नेते निलेश रावते व युवा नेते ललित जोशी ह्यांनी ह्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या."

- अजिंक्य घोलप, उपसरपंच खामगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा