Breakingजुन्नर : अखेर 'त्या' आदिवासी गावातील मोबाईल टॉवर सुरु, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरणजुन्नर (दि. ३): जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील मोबाईल नेटवर्क पासून वंचित असणाऱ्या कोपरे परिसरात मोबाईल टॉवर सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


कोपरे परिसरात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी सातत्याने केली जात होती. "महाराष्ट्र जनभूमी" ने या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. 


पहिली बातमी (click here)

जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागात लक्ष घालणारे लोकनेते आहेत का?
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले टॉवर उभारणीचे काम पूर्ण होऊन आज हा टॉवर कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे कोपरे व अन्य गावांच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन शिक्षण घेता येणार आहे.


या टॉवरच्या उद्घाटन प्रसंगी जि. प. सदस्य अंकुश आमले, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, विजय कोल्हे, अमित बेनके, कोपरे गावचे सरपंच ठमाजी कवठे, मांडवे गावच्या सरपंच दाभाडे परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा