Breaking
जुन्नर : "आरोग्य आपल्या दारी, दवाखाना आपल्या घरी" लोकप्रतिनिधींंचा अभिनव उपक्रम


जुन्नर (पुणे) : पावसाळ्यामुळे साथीचे व  इतर आजार तसेच कोरानाचे संकट व लॅाकडाऊन यामुळे एस. टी. व खासगी वाहतुक पुर्ण पणे बंद होती. त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी लोंकाना गाडी उपलब्ध होत नव्हती.  ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे व केवाडी गावचे सरपंच अमोल लांडे यांनी "आरोग्य आपल्या दारी, दवाखाना आपल्या घरी" ही संकल्पना यशस्वी पणे ५२ गावामध्ये गेल्या एक महिन्यापासुन राबविन्याचे काम सुरू केले आहे.


आदिवासी भागातील प्रत्येक गावा गावात व वाडीवस्तीवर जाऊन संपुर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन  नागरीकाला तपासुन थंडी, ताप, सर्दी, खोकला, रक्तवाढीसाठी, कॅल्शियम वाढीसाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी व्हिटयामिन सी, डी प्लस पावडर, झिन्क  इ. १५ प्रकारच्या गोळ्या औषधांचे वाटप कुटुंबांंना घरपोच करण्यात आले.

त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंंद्र आपटाळे, इंगळुन व मढ येथील सर्व आरोग्य यंत्रणांंचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा