Breaking
जुन्नर : राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ने तहसीलदारांकडे केली महत्त्वपूर्ण मागणी


जुन्नर / रफिक शेख : राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा च्या वतीने विविध मागण्या तहसीलदार हनमंत कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.


निवेदनात म्हटले आहे की, सालाबादाप्रमाणे यावर्षी 21 जुलै 2021 रोजी संपूर्ण देशामध्ये बकरी ईद हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षी अनेक ठिकाणी गाड्या अडविण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे ईद हा सण साजरा करता आला नाही. तसेच अनेक गाड्यांमधील कित्येक बकरे राज्य सीमेवर गाड्यांमध्ये मरण पावले होते. यामुळे मुस्लिम बांधवांचे तसेच अनेक शेतकरी आणि गरीब लोकांचे सुद्धा त्यामध्ये नुकसान झाले होते, कारण बकरी ईद मधील कुर्बानी मधला मोठा हिस्सा हा गरीब लोकांमध्ये वाटला जातो. 

यावर्षी गतवर्षी सारखा प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने अगोदरच आवश्यक त्या सूचना जारी कराव्यात आणि पवित्र बकरी ईदचा सण साजरा करण्यास अनुकूल  वातावरण तयार व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष जनाब इम्रान मोमीन, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष अश्फाक तिरंदाज व महासचिव जनाब शेख मजर व बामसेफचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष  दिनकर जाधव हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा