Breaking
जुन्नर : मनरेगा योजनेतून ग्रामीण भागात मिळतोय हक्काचा रोजगार


जुन्नर : मागील वर्षपासून जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुका किसान सभेने जिल्हा परिषद आणि जुन्नर पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने मनरेगा अंतर्गत जुन्नर तालुक्यात 15  गावांमध्ये वृक्ष लागवड करून 3 वर्ष वृक्ष संगोपन करण्यासाठी मजूर नेमण्यात आले.


त्यामध्ये आज किसान सभेच्या जुन्नर तालुका समितीचे पदाधिकारी खैरे-खटकाळे गावातील मजुरांची कामाच्या ठिकाणी संवाद साधून मजुरांच्या समस्या जाऊन घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले.

गेल्या वर्षभरापासून मजुरांना वृक्ष संगोपन करताना दिवसाची 248 रूपये मजुरी मिळते म्हणजे महिना 6,448 रुपये मिळतात. खैरे - खटकाळे गावात 8 मजूर या ठिकाणी 1600 झाडाचे संगोपनाचे काम करतात.


वृक्ष संगोपन करून आतापर्यत 60,000 रुपये पेक्षा जास्त रक्कम मजुरांना गेल्या वर्षभरात  मिळाली आहे, असे खैरे गावात काम करणाऱ्या भागू सीताराम बोऱ्हाडे या मजूरांने सांगितले. ते म्हणाले की ग्रामीण भागात शेतीचे उत्पन्न सुद्धा नाही. महिला मजूर आशा सीताराम केदारी, सुनीता पोपट केदारी यांनी गावाजवळ रोजगार जर मिळत असेल तर  महिला बाहेरगावी जाण्याची गरज नाही आणि सुरक्षित रोजगार आणि तोही महिलांच्या खात्यावर जमा होतो आणि पुरुष आणि महिला एकच मजुरी मिळतेय. यामुळे ग्रामीण महिलांनी जास्त जास्त मनरेगा अंतर्गत रोजगार मागणी करावी असे आवहान केले.

मजूर म्हटले की मनरेगा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल या साठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मजुरांनी किसान सभेचे आभार व्यक्त केले. 

जुन्नर तालुक्यात ग्रामीण भागातील जास्त जास्त लोकांनी मनरेगा कायद्याच्या मिळणाऱ्या हक्काचा रोजगार आपापल्या ग्रामपंचायत कार्यलायाकडे मागणी अर्ज करून मागावू असे आवहान किसान सभेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, तालुका सदस्य कोंडीभाऊ बांबळे, खैरे - खटकाळे गावचे रोजगार सेवक सचिन मोरे मनरेगा वर काम करणारे मजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा